प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा- प्रांतधिकारी सचिन ढोले - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 25 January 2020

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा- प्रांतधिकारी सचिन ढोले

 पंढरपूर,  - राष्ट्रध्वजाचा मान राखणे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून राष्ट्रध्वजाचा  मान राखला जावा तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती  करु नये, असे आवाहन प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
            प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर व कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: डलेले असतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता मध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत तरतूद केलेली आहे.तसेच खराब झालेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपुर्वक नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत.
 केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास मान्याता नाही. अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करुन आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवावा असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले यांनी केले आहे.   

add