पुस्तकावर बंदी घाला अन्यथा आंदोलन छेडणार- डॉ. संतोष मुंडे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 13 January 2020

पुस्तकावर बंदी घाला अन्यथा आंदोलन छेडणार- डॉ. संतोष मुंडे


Pandharpur Live : 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदी यांची तुलना होऊ शकत नाही  
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची क्षणभरही तुलना होऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया व पुस्तकावर बंदी घाला अन्यथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी  दिला. 


      तसेच यावेळी बोलंतांना डॉ. संतोष मुंडे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडलं नाही त्यांचं राज्य हे रयतेच राज्य होत. त्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नसल्याची टीका त्यांनी केली. शिवाजी महाराजांचा भक्त म्हणू शकतो सैनिक म्हणू शकतो, कदाचित सच्चा सैनिक म्हणू शकतो. मात्र, शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणे हा शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे, आम्ही त्याचा निषेध करतो आणि ते पुस्तक तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी करतो.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केलं होतं. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापती मध्ये मुस्लिम सेनापती संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्याच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. ते ज्या प्रकारे कायदे करत आहे. त्यात जनहित नसून कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. मोदी जी फक्त एकट्याचे पाईक आहेत. एखाद्या स्वराज्यावर पाईक असणाऱ्या माणसाने मीच राजा असे म्हणून चालणार नाही, छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले. असा टोला देखील त्यांनी मोदी यांच्यावर लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची क्षणभरही तुलना होऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया व पुस्तकावर बंदी तात्काळ घाला अन्यथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिला.No comments:

Post a Comment

Pages