पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिनदर्शिकेचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. कामगार व उत्पादक मंत्री, सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री ना . दिलीप वळसे पाटील यांचे शुभहस्ते सोलापूर येथे दि २५ रोजी हे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष दिपक (आबा ) साळुंखे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, पंढरपूर जिल्हा परीषद सदस्य अतूल खरात, शहराध्यक्ष सुधीर भोसले,  प्रदेश युवक सचिव अरूण आसबे, शहर उपाध्यक्ष सचिन कदम, गिरीष चाकोते, संघटक सचिन सोळंकी, ओ बी सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा कार्यकर्णी सदस्य आर.डी. पवार सर, प्रवीण भोसले, समीर मोरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments