उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुण्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Sunday, 26 January 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुण्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ


पुणे | गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात उदघाटन कार्यक्रम पार पडला.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात 11 ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आलं. तयार स्वयंपाकगृह आणि 25 माणसं एकाचवेळी जेऊ शकतील, अशी व्यवस्था असणाऱ्यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे. काही दिवसांनंतर बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचं कळतंय.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रूपयांत जेवण उपलब्ध करूण देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे 40 रूपये अनुदान मिळणार असून दहा रूपये ग्राहकाकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी पुणे शहर अन्नधान्य पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन केले आहे.यावेळी अजित पवार यांनी आज पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. शहरात आणि ग्रामीण भागात दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत.

Ad