राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जंयती निमित्त छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत विविध कार्यक्रम संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 13 January 2020

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जंयती निमित्त छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत विविध कार्यक्रम संपन्नPandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जंयती निमित्त पंढरीत छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्टानच्या वतीने दि. 10 जानेवारी रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरा मधे 120 जणांनी रक्तदान केले.    या शिबीराचे उद्घाटन मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले व पंढरपुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.


दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 11 जानेवारी रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  दि. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ  माँसाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन सौ. माने ताई, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख सागर कदम, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे पंढरपुर शहर अध्यक्ष संदिप मांडवे, माजी नगराध्यक्ष संजय घोडके व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  सांयकाळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्याची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. या मिरणुकीचे वैशिष्ट म्हणजे मिरवणुकीत वारकरी सांप्रदायाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बाल वारकर्‍यांनी मिरवणुकीदरम्यान अभंग, किर्तन सादर केले. त्याच प्रमाणे मिरवणूकीत सहभागी झालेले घोड्यावर स्वार झालेली मावळ्यांच्या वेशातील लहान मुलं सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती. या सर्व सोहळ्याचे आयोजन छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोसले व त्यांच्या सहकारी मित्रांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Pages