राष्ट्रपती पदक- महाराष्ट्रातील 54 पोलिसांना मिळणार सन्मान - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 26 January 2020

राष्ट्रपती पदक- महाराष्ट्रातील 54 पोलिसांना मिळणार सन्मान



प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 1040 पोलिसांना शनिवारी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. पोलीस दलात केलेल्या शौर्य, उल्लेखनीय, गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल ही पदके जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील 54 पोलिसांचा समावेश आहे. त्यात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एसीपी नंदकिशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक काब्दुले, पोलीस निरीक्षक सुधीर दळवी यांचा समावेश आहे. आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी आणि संजय सक्सेना यांना विशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे.

देशातील 4 पोलीस अधिकाऱयांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, 286 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना पोलीस शौर्य पदक तर 93 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना विशिष्ट सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

शौर्य पदक - मिठू जगदाळे, सुरपत वड्डे, आशीष हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ. एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे.
विशिष्ट सेवा पदक - अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (एसीपी), वसंत साबळे (एपीआय).

गुणवत्ता सेवा पदक - धनंजय कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), नंदकुमार ठाकूर (उपायुक्त, मुंबई), अतुल पाटील (अतिरिक्त आयुक्त मुंबई), नंदकिशोर मोरे (एसीपी, मुंबई), स्टीव्हन मॅथ्यू अँथनी (एसीपी, मुंबई), निशिकांत भुजबळ (एसीपी, संभाजीनगर), चंद्रशेखर सावंत (उपाधीक्षक, अकोला), मिंिंलद तोतरे (निरीक्षक, नागपूर), सदानंद मानकर (निरीक्षक, अकोला), मुपुंद पवार (वरिष्ठ निरीक्षक, मुंबई) संभाजी सावंत (निरीक्षक, सांगली), कायोमर्ज बोमन इरानी (एसीपी, मुंबई), गजानन काबदुले (वरिष्ठ निरीक्षक, मुंबई), 14. नीलिमा अरज (निरीक्षक, अमरावती), इंद्रजित कारले (एसीपी, ठाणे) गौतम पराते (निरीक्षक, संभाजीनगर), सुभाष भुजंग (निरीक्षक जालना), सुधीर दळवी (निरीक्षक, मुंबई), किसन गायकवाड (निरीक्षक, नवी मुंबई), जमिल सय्यद (उपनिरीक्षक, नांदेड), मधुकर चौगुले (उपनिरीक्षक, कोल्हापूर), भिकन सोनार (उपनिरीक्षक, जळगाव), राजू अवताडे (एएसआय, अकोला), शशिकांत लोखंडे (एपीआय, मुंबई), अशफाख अली चिस्तीया (कॉन्स्टेबल, गडचिरोली), वसंत तराटे (एएसआय, मुंबई), रवींद्र नुल्ले (एएसआय, कोल्हापूर), मेहबूब अली सय्यद (एएसआय, नाशिक शहर), साहेबराव राठोड (एएसआय), दशरथ ंिचचकर (एएसआय, पुणे) लक्ष्मण टेंभुर्णे (एएसआय, गडचिरोली), बट्टुलाल पांडे (एएसआय, नागपूर), विष्णू गोसावी (एएसआय, नाशिक), प्रदीप जांभळे (एएसआय, पुणे), चंद्रकांत पाटील (एएसआय, जळगाव), भानुदास जाधव (कॉन्स्टेबल, मुंबई), नितीन मालप (इंटेलिजन्स अधिकारी, मुंबई), रमेश ंिशगाटे (कॉन्स्टेबल, मुंबई), बाबूराव बिऱहाडे (इंटेलिजन्स अधिकारी, नाशिक), संजय वायचळे (कॉन्स्टेबल, नाशिक)

सात अग्निशमन अधिका-यांना शौर्यपदक
अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱयांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. यामध्ये प्रभात रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी) राजेंद्र चौधरी (उपमुख्य अधिकारी), रवींद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), मिंिंलद दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी), अभिजित सावंत (स्टेशन अधिकारी), सुधीर वर्तक (वाहनचालक), दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांचा समावेश आहे.

पाच जीवन रक्षा पदक
महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहीर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते. जीवन रक्षा पदक जाहीर झालेल्यांमध्ये एन. कार्तिकेयन, प्रमोद बाळासाहेब देवडे, शिवराज रामचंद्र भांडारवड, दत्तात्रय सुरेश टेंगळे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Pages