प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण

 
 
 

 पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनी  प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
          रेल्वे मैदान, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय ध्वजारोहण समारंभात पोलीस, गृहरक्षक दल, एन.सी. सी., स्काऊट आणि  विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या 42 पथकांनी सहभाग घेतला होता. प्रांताधिकारी श्री.ढोले यांनी संचलनाची  पाहणी करुन मानवंदना स्विकारली. तसेच यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रकट वाचन करण्यात आले.
            ध्वजारोहणाच्या या समारंभास पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, तहसिलदार वैशाली वाघमारे, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता पी.जी.चव्हाण, उप कार्यकारी अभियंता हनुमंत बागल, प्र. महसूल नायब तहसिलदार वैभव बुचके, यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, नगरसेवक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, नागरीक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.