माघी वारी काळात चौफाळयातील नारळ, हार व पुजेचे साहित्य विक्रीस बंदी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 24 January 2020

माघी वारी काळात चौफाळयातील नारळ, हार व पुजेचे साहित्य विक्रीस बंदी

माघ वारी काळात मनाई
                पंढरपूर, दि. 24 -  पंढरपूर  शहरात दिनांक 1 ते 8 फेब्रुवारी 2020 या कालावधीत माघ वारी  भरत आहे. माघ वारी निमित्त श्री. विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी  मोठ्याप्रमाणात  भाविक येतात. माघ दशमी व  एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर मोठ्याप्रमाणात गर्दी होते.  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  चौफाळा येथे  रस्सीचा वापर केला जातो. गर्दीमुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी सारखा  प्रकार होण्याची शक्यता असल्याने, हार ,फुले, पुजेचे साहित्य विक्रेते व हातगाडी वाले आदींना विक्री करण्यास मनाई आहे.
                   चौफाळा येथील गोपाळकृष्ण मंदीरावरील कठड्यावर व मंदीरा समोर  हातगाडे, हार व फुल विक्रेते, फोटो व प्रसाद विक्रेते  विक्रीसाठी थांबतात.  या कालावधीत  शिवाजी चौक व काळा मारुती चौक येथून मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे सदरठिकाणी चेंगराचेंगरी होवून  कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पंढरपूर उपविभागीय  अधिकारी  सचिन ढोले यांनी फौजदारी संहितेच्या कलम 144 अन्वये  चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदीर येथे  हार फुले व इतर पुजेचे साहित्य विक्री करण्यास  मनाई आदेश जारी केले आहेत.  हे आदेश्‍ 04  फेब्रुवारी  सकाळी 08.00 वाजले पासून 06 फेब्रुवारी 2020  रात्री 08.00 वाजेपर्यत लागू राहतील असेही आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages