सुशील ग्रुप प्रस्तुत ’” मैफिल सप्तसुरांची ” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 30 January 2020

सुशील ग्रुप प्रस्तुत ’” मैफिल सप्तसुरांची ” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने


पंढरपूर लाईव्ह - येथील टाकळी रोड वरील गिरिजात्मक नगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती निमित्त सायंकाळी 7 वाजता सुशील ग्रुप प्रस्तुत ’” मैफिल सप्तसुरांची ” हा सुश्राव्य असा कार्यक्रम झाला . 

या मध्ये श्री. श्रीकांत कुलकर्णी , सौ. योगिनी ताठे , सौ. शर्वरी मुळे  यांनी विविध प्रकारची गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले . 

श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रथम तुला वंदितो, जीवनात ही घडी, सखी मंद झाल्या तारका, दैव जात दुखहे भरता व सौ. योगिनी ताठे यांनी अनादि निर्गुण, चांदणे शिंपीत जाशी, ऐन दुपारी, जिवलगा कधी रे येशील तू, तसेच सौ. शर्वरी मुळे यांनी माय भवानी हृदयी जागा, ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर, मी शरण तुला जय आंबे मा अशी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला उत्कृष्ठ तबला साथ श्री. सुशील कुलकर्णी व हारमोनियम ची साथ श्री. अरविंद लिमये यांनी केली. सौ. स्वाती जोशी –आराध्ये यांनी निवेदन करून या कार्यक्रमाला अधिक च रंगत आणली. कार्यक्रमाची सांगता सौ. सावनी व सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती ने झाली. 

No comments:

Post a Comment

Pages