चालकाने बेदरकारपणे ट्रक चालवल्यानेच ‘तो’ ट्रक नदीत पडला... चालक अद्याप बेपत्ता... पुलावरील अपघात टाळण्यासाठी 'या' उपाययोजना करणे अत्यावश्यक! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 13 January 2020

चालकाने बेदरकारपणे ट्रक चालवल्यानेच ‘तो’ ट्रक नदीत पडला... चालक अद्याप बेपत्ता... पुलावरील अपघात टाळण्यासाठी 'या' उपाययोजना करणे अत्यावश्यक!


Pandharpur Live : 
काल संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक मालट्रक क्रमांक एम. एच. 45 ए.एफ. 9955 हा चालकाच्या बेदरकारपणे चालवल्यामुळेच चंद्रभागेत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. काल रात्री सदर ट्रक चंद्रभागा नदीवरील अहिल्यादेवी ब्रिज वरून खाली पाण्यात पडला होता. प्रशासनाकडून ट्रकचा शोध लावला परंतु ट्रक चा चालक साधिक जहांगीर पठाण रा. बार्शी हा अद्याप बेपत्ताच आहे. त्याचा शोध युध्दपातळीवर घेण्यात येत आहे.

सदर पुलावर अशा प्रकारचा अपघात होऊन मागील काही महिन्यांपुर्वी एक दुधाचा टँकरही पाण्यात पडला होता. येथील अपघात टाळण्यासाठी तत्परतेने खालील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत कांही तज्ञ मंडळींनी पंढरपूर लाईव्ह कडे व्यक्त केले.
1) सदर पुलाच्या दोन्ही बाजुकडील कठड्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
2) पुल सुरु होतो तिथे आणि पुल संपतो तिथे कांही अंतरावर गतीरोधक बसवणे आवश्यक आहे.
3) पुलाच्या दोन्ही बाजुला सदर पुल अपघात क्षेत्र असुन येथून वाहने सावकाश चालवावीत वगैरे सुचना फलक बसविणे आवश्यक.
पुलाचे रुंदीकरण होणेही आवश्यक आहे; परंतु तुर्तास वरील उपाययोजना तातडीने केल्या तरी अपघातास आळा बसेल असे मत कांही तज्ञ मंडळींनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केले.       काल रात्री तीन तास ट्रकच्या चालकाचा शोध घेऊनही त्याच्या विषयी काहीही माहिती मिळाली नव्हती. रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवून सकाळी परत दहा वाजता पोलिसांनी स्थानिक पोहता येणारे लोक, इतर प्रशासन  यांच्या मदतीने शोध कार्य चालू करून दुपारी दोन वाजता पाण्यात पडलेल्या ट्रक पाण्याच्या वर काढून पाहणी केली असता चालका विषयी काहीही माहिती मिळाली नाही. 
 ट्रक च्या नंबर वरून मालकाचा शोध घेतला असता मालक अभेदा मिरासाब डाळवाले रा. कुर्डवाडी हे असल्याचे समजले. तो ट्रक राजेश रोडलाईन कुर्डूवाडी यांच्याकडे चालत असून रोडलाईन्स चे मालक राजेश गांधी यांना संपर्क करून अधिक माहिती घेतली असता या ट्रकचा चालक साधिक जहांगीर पठाण रा. बार्शी हा असल्याचे समजले अद्याप पर्यंत झालेल्या शोधकार्यावरून चालकाचा काहीही तपास लागला नाही एक तर तो चालक ट्रक खाली पाण्यात पडत असताना उडी मारून पाण्यातून पोहुन बाहेर पडला असेल किंवा नदीच्या तळाशी बुडून मयत झाला असावा असे वाटते अद्यापपर्यंत याबाबत काहीही माहिती मिळत नाही. 
    सध्या स्थानिक प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम च्या मदतीने चालकाचा शोध घेत आहे.


No comments:

Post a Comment

Pages