खुशखबर- महाराष्ट्र सरकारने सुरू केली तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 31 January 2020

खुशखबर- महाराष्ट्र सरकारने सुरू केली तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांतील तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच भरतीच्या हालचाली सुरु होतील व विविध विभागांतील 70 हजार रिक्‍त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

नव्या महाराष्ट्र सरकारने विविध विभागांतील तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, सर्व विभागांतील रिक्‍त पदांचा आढावा घेण्यात आला आहे. ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे असल्याने तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वंच मंत्र्यांनी केली.

 महाभरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स महाभरती.इन या वेबसाईट वर वेळोवेळी प्रकाशित होत रहातील. हि भरती लवकर सुरु व्हावी यावर सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले.
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 72 हजार रिक्‍त पदांच्या मेगाभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यात 36 हजार पदे भरण्यात येणार होती. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्‍त पदांबाबत चर्चा झाली. सर्वंच विभागांच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागातील रिक्‍त पदांबाबत चिंता व्यक्‍त केली. स्थानिक पातळीवर हजारो पदे रिक्‍त असल्याने प्रशासनावर प्रचंड भार असल्याने कामे रेंगाळत असल्याची खंत मंत्र्यांनी व्यक्‍त केली. ही रिक्‍त पदे तातडीने भरण्यासाठीचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यायला हवा, यावर सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले. लवकरच या महाभरतीच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करून प्रक्रिया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील वर्ग-1 व 2 यांच्यासहित तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्‍त पदांचा आढावा जाहीर करावा. अशा सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मेगाभरतीसाठी ज्या पोर्टलची निवड केली होती त्या पोर्टलला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. यात नव्या स्वरूपातील पारदर्शक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्याचाही विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला.

विभाग नुसार रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे :-
  • ग्रामविकास विभाग : 11000
  • गृह विभाग : 7111
  • कृषी विभाग : 2500
  • पशु व दुग्ध संवर्धन विभाग : 1047
  • सार्वजनिक बांधकाम : 8330
  • जलसंपदा : 8220
  • जलसंधारण 2433
  • नगरविकास : 1500
  • आरोग्य : 10,560

No comments:

Post a Comment

Pages