पंढरपूर एस.टी. महामंडळ आगारावर विद्यार्थी नाराज.... बस वेळेवर न आल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे बस वेळेवर सोडण्याच्या मागणीचे पंढरपूर आगार व्यवस्थापकास निवेदन


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर परिसरातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंजिनिअरींग चे शिक्षण घेण्यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात येत आहेत. परंतु पंढरपूर ते खवासपुर एसटी बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पंढरपूर ते खवासपुर एसटी बस वेळेवर सोडण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिनांक ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी तात्कालिक आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना बस वेळ सोडविण्यासाठी विनंती केली होती. माञ सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंती अर्जाची दखल पंढरपूर आगार व्यवस्थापकांकडून घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातुन विचारला जात आहे.
  ग्रामीण भागातील मुली-मुले वेळत घरी जाण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी आगार व्यवस्थापक सुतार यांना पुन्हा निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे, पंढरपूर ते खवासपुर एस टी बस ही सायंकाळी महाविद्यालय सुटते त्या दरम्यान म्हणजे ५:३० ते ५:४५ दरम्यान सोडण्यात यावी ही बस खवासपुर, चिक-महूद,कटफळ, तिसंगी,गार्डी लोणारवाडी, पळशी, खिलारवाडी, गायगव्हान या खेड्यातून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांची सोय होईल. हि बस वेळ वर न आल्याने मुला-मुलीना खूप उशिरा एसटीची वाट पाहत बसावे लागते.  यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते व या बस मध्ये अनेक वेळा विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांना वेळेवर घरी जाणे खूप गरजेचे आहे. बस वेळेवर न आल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे हि बोलले जात आहे.
   सिंहगड महाविद्यालयाने वारंवार पंढरपूर आगाराची पत्रव्यवहार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन  पंढरपूर ते खवासपुर एसटी बस वेळेवर सोडावी अशी मागणी सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

आमचे काॅलेज सायं. ५:३० सुटते आम्हाला वेळेत घरी जाणे गरजेचे असते. परंतु खवासपूर बस वेळेवर येत नसल्यामुळे कधीकधी आम्हाला रात्रीचे नऊ सुद्धा रस्त्यावर थांबावे लागले आहे. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते वेळ सुद्धा वाया जातो त्यामुळे आगार विभागाने वेळेवर बस सोडून आम्हाला सहकार्य करावे.
-रूपाली कांबळे

विद्यार्थिनी सिंहगड काॅलेज पंढरपूर 
विद्यार्थ्यांची ये-जा करण्याची अडचण लक्षात घेऊन पंढरपूर आगाराने ५:३० वाजता पंढरपूर ते खवासपूर एस.टी. बस. अगदी न चुकता वेळेवर सोडण्यासाठी महाविद्यालयाने वारंवार पाठपुरवा करून सुद्धा पंढरपूर आगार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या च्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातू तसेच शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पंढरपूर आगाराने एस. टी बस वेळेवर सोडावी.-प्राचार्य डॉ. कैलाश करांडे  प्राचार्य सिंहगड कॉलेज पंढरपूर