मोदी सरकारचा निर्णय- 24 आठवड्यांनीही करता येणार गर्भपात - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 29 January 2020

मोदी सरकारचा निर्णय- 24 आठवड्यांनीही करता येणार गर्भपात


नवी दिल्ली -महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली 20 आठवड्यांची मर्यादा 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सुधारीत मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी कायदा 1971 मध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे नवं विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

20 आठवड्यात गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे 24व्या आठवड्यात गर्भपात करणं महिलांसाठी सुरक्षित राहिल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गर्भपातासाठी 24 आठड्यांपर्यंत मुदत वाढवण्यात मुदत वाढवण्यात आल्याने बलात्कार पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना यामुळे मोठा दिलासा मिळेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment

Pages