आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 7 जोडपी विवाहबद्ध - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 17 February 2020

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 7 जोडपी विवाहबद्धPandharpur Live-

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक चंद्रभागेच्या वाळवंटात होणारच!- अशोकजी भांगरे
पंढरपूर (प्रतिनिधी):- सालाबादप्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त भव्य सामुदायिक विवाह सोहळा दि.  14/02/2020 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेच्या पाठीमागे वाल्मिकी भवन येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये नव वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे वंशज अशोकजी भांगरे यांची सपत्नीक प्रमुख उपस्थिती लाभली होती. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक चंद्रभागेच्या वाळवंटात उभारण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाने व संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करत, ‘‘आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक चंद्रभागेच्या वाळवंटात होणारच! व यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु.’’ अज्ञान, गरीब, वंचीत कोळी महादेव जमातीवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचे मत अशोक भांगरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
 
भारतीय समाज जीवनामध्ये विवाह हा अत्यंत पवित्र असा संस्कार मानला जातो, परंतु सध्या विवाह म्हणजे जीवघेणा हुंडा, मानपान व पैशाची उधळपट्टी होत असते परंतु सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाने ग्रासलेला आहे. या परिस्थितीमध्ये मुला मुलींचे लग्न करणे हे आईवडिलांना आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होत आहे हि समाजाची गरज ओळखून, महर्षी वाल्मिकी संघ यांच्या मार्फत सामुदायिक विवाह सोहळा हि संकल्पना राबवित आहेत. या विवाहामध्ये हुंडा देणे घेणे , अनावश्यक खर्च या गोष्टींना फाटा देऊन 7 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सामुदायिकरीत्या पार पाडण्यात आला. महर्षी वाल्मिकी संघातर्फे विवाहाच्यावेळी वधूस शालू. हळदीची साडी, मणीमंगळसूत्र, जोडवे, बिचव्या , मुंडावळ्या, हारतुरे, देण्यात आले व भोजन तसेच नवदापंत्यासाठी संसार उपयोगी भांडी देण्यात आली व वधूवरांचे भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.

अशी माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली. सर्व संघटनाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते व जेष्ठ यांच्यासह समाजातील नेते मंडडळी, महिला भगिणी, अबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परीश्रम घेतले.

add