पंढरपुर- कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात... पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याचा मृृत्यु - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 10 February 2020

पंढरपुर- कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात... पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याचा मृृत्यु

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी ग्रामपंचायतीचे सदस्य धनाजी बबन लवटे यांचा या अपघातात मृत्यु झाल्याने कौठाळी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Pandharpur Live Online-
पंढरपुर- कुर्डुवाडी रस्त्यावर शेटफळ हद्दीत वागज वस्तीजवळ एसटी बस व बुलेट मोटार सायकलचा अपघात झाला. यामध्ये बुलेटवरील दोघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. रविवारी (ता. ९) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शेटफळ हद्दीत ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सांगली आगाराची सांगली- शेगाव गाडी कुर्डवाडीकडे जात होती. दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून शेटफळ चौकाकडे निघालेल्या बुलेट मोटरसायकलला एसटीची धडक बसली, या बुलेटवरील पंढरपूर तालुक्यातील कौठाळी ग्रामपंचायतीचे सदस्य  धनाजी बबन लवटे (वय २७, रा. कौठाळी, ता. पंढरपूर) व महादेव रमेश शिंदे (वय १६, रा. पंढरपूर) हे दोघे जागीच ठार झाले. 

अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकाचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे व हायवे पेट्रोलिंगचे नाना उघडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यास मदत केली.

add