बार्शी पोलीस ठाण्यासमोर एसटी बसची धडक... अपघातात तरूणाचा मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 18 February 2020

बार्शी पोलीस ठाण्यासमोर एसटी बसची धडक... अपघातात तरूणाचा मृत्यू


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा धक्‍का लागल्यामुळे जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या समोर झाला.

परमेश्‍वर ऊर्फ प्रमोद बबन बोकेफोडे (वय 29, रा. 1690, झाडबुके मैदान, बार्शी) असे बसच्या धडकेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. एसटीचालक उमेश चव्हाण (रा. पांगरी, ता. बार्शी) असे अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. संतोष बबन बोकेफोडे (वय 33, रा. भीमनगर, बार्शी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीचा धाकटा भाऊ परमेश्‍वर हा त्याच्या पत्नीसह झाडबुके मैदान येथे राहण्यास असून तो भाजी मार्केट येथे भाजी विकण्याचे काम करत होता.

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वडील व पत्नीसह पायी बार्शी चौकातून सिमेंटरोडने जात असताना समोरुन येणार्‍या माढा ते बार्शी या एसटी बसचा (एमएच 20 डी 8168) प्रमोदला समोरून डाव्या बाजूस जोराचा धक्‍का बसल्याने तो जोरात सिमेंट रोडवर पडला. त्यामुळे त्याच्या तोंडावर, नाकावर, डोक्यास, उजव्या हातास मार लागून बेशुद्ध पडला. त्यास आजूबाजुच्या लोकांनी व पोलिसांच्या मदतीने जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे दाखल केले. मात्र उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.

एसटी बसचालक म्हणून उमेश जनार्धन चव्हाण (रा. पांगरी, ता. बार्शी) व वाहक म्हणून प्रमोद ज्ञानदेव शिंदे (रा. चव्हाण प्लॉट, बार्शी) आदी या एसटीमध्ये कार्यरत होते. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

add