पंढरपूर-माळशिरस मार्गावर भीषण अपघात... एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 2 February 2020

पंढरपूर-माळशिरस मार्गावर भीषण अपघात... एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Pandharpur Live Online - पंढरपूर-माळशिरस मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर खुडूस दरम्यान वेळापूरकडे  कार आणि सिमेंटने भरलेल्या टँकरची समोरासमोर धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर एका चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.  

पंढरपूर-माळशिरस मार्गावर वेळापूरच्या पिसेवाडी पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण  ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एर्टिगा कार (MH -13 CG 5599) आणि ट्रक (MH-09 BC- 2099) यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. 

कार वेळापूरकडून माळशिरसच्या दिशेने निघाली होती. हा अपघात इतका भीषण होता की सहा जण जागीच ठार झाले. तर इतर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.


वैराग तालुका बार्शीचे फलफले कुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते. अपघातातील मृतांची नावे शिवराज नागेश फलफले वय (38), दिनानाथ उर्फ बाबासो नागेश फलफले (34), वनिता शिवराज फलफले (30), उत्कर्ष शिवराज फलफले (9), सहयाद्री बाबासो फलफले (6), पार्वती महादेव फलफले (80) अशी असून हे सर्व वैराग, तालुका माढा इथले रहिवासी आहेत.


No comments:

Post a Comment

Pages