पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 4 February 2020

पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरला येथे पंढरपूर- मंगळवेढा  मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 4/2/2020 रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात इसमाचा (वय अंदाजे 40 वर्षे) मृत्यू झाला आहे.  

मयत स्थितीत आढळून आलेल्या सदर व्यक्तीबाबत अधिक माहिती असल्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी केले आहे. पंढरपूर तालुका पोलिस दूरध्वनी क्रमांक.- (02186) 223559

add