पंढरपूर नजीक अपघात... ऊसाची ट्रॉली क्रुझरवर कोसळली! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 3 February 2020

पंढरपूर नजीक अपघात... ऊसाची ट्रॉली क्रुझरवर कोसळली!


Pandharpur Live -
पंढरपूर दि.03/02/2020:- पंढरपूर पुणे मार्गावर गादेगाव फुटरस्त्यालत बाजीराव विहिरीजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर बाजुने जात असलेल्या क्रुझर  (एम एच 20 डि व्ही 25 51 ) गाडीवर कोसळुन अपघात घडला. या अपघातात क्रुझर गाडीचा चालक  जखमी झाला आहे  तसेच गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

       याबाबत समजेलली अधिकची माहिती अशी की. क्रुझर गाडी पंढरपूरकडे येत होती. सदर गाडीतील प्रवासी जेजुरीहून देवदर्शन करून येत होते आणि ऊसाने भरलेला ट्रॅक्टर हा पंढरपूर कडून वेळापूरया दिशेने जात होता. दरम्यान बाजीराव विहिरीच्या जवळ हा अपघात घडला असून पोलीसांना अपघाताची माहिती कळवलेली आहे.

No comments:

Post a Comment

Pages