कोरोना व्हायरस- चीनमध्ये थैमान सुरूच... भारताला धोका कमी... जगभरातील देशांमध्ये भीतीचं वातावरण


Pandharpur  Live Online - कोरोना विषाणुची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या 640 पैकी एकाही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणुचा भारताला धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वांना आणखी काही दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.

 दरम्यान चीनच्या नवीन कोरोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता 904 वर पोहोचली आहे. गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (सार्स, एसएआरएस) 2002 ते 2003 या कालावधीत ज्या मार्गाने ग्रस्त होता त्यापेक्षा सार्स ही एक मोठी महामारी म्हणून उदयास आली आहे. एसएआरएसमुळे 774 मृत्यू झाले असताना आता कोरोना विषाणूने 904 लोकांचा जीव गिळला आहे.

कोरोना व्हायरसनं चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगात दहशत पसरवली आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 904 जण दगावले आहेत. अधिकृत आकडा एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोना व्हायरसची 40 हजार रुग्णांना लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीन सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव वाढल्याची चर्चा सुरू आहे. जेव्हा वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरत होता, तेव्हा सरकारी पातळीवर एकमेकांवर जबाबदारी टाकली जात असल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. मात्र सरकारने व्हायरस पसरण्यामागे जनतेलाच जबाबदार धरलं आहे.

हा उद्रेक चीन आणि हाँगकाँगमध्ये सर्वाधिक दिसून आला. चीनमध्ये पसरलेल्या या सर्वत्र, जगभरातील देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वत्र वैज्ञानिक उपाय शोधत आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणतेही प्रभावी औषध समोर आले नाही.


डिसेंबर 2019 मध्ये वुहानच्या पशु बाजारातून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला होता. वुहानमध्येच या आजाराचा परिणाम सर्वाधिक आहे. तेथे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

चिनी आरोग्य अधिकारयांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 31 प्रांतिक पातळीवरील आणि झिनजियांग उत्पादन व बांधकाम कॉर्पोरेशनमधून शनिवारी कोरोनाव्हायरस संसर्गाची 2,656 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वृत्तानुसार, हे मृत्यू हुबेई प्रांतात 81, हेनानमधील दोन, हेबई, हेलोंगजियांग, अनहुई, शेडोंग, हुनान आणि गुआंगझो स्वायत्त प्रदेशात झाले. शनिवारी, 3,916 नवीन संशयित प्रकरणे नोंदली गेली.

गंभीर स्थितीत 6188 लोक शनिवारी 87 रुग्ण गंभीर आजारी पडले आणि 600 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शनिवारी अखेरीस चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 37,198 वर पोहोचली. या आजारामुळे एकूण 811 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील, 6188 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून 28,942 लोकांना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आहे.
2,649 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

चीनमध्ये बरे झाल्यानंतर एकूण 2,649 लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 3,71,905 लोक कोरोनाव्हायरस पीडित व्यक्तींच्या निकट संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे, त्यापैकी, 31,124 जणांना शनिवारी वैद्यकीय पाळत ठेवून सोडण्यात आले आहे, तर 1,88,133 अद्याप वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

शनिवारच्या अखेरीस हॉंगकॉंग विशेष प्रशासकीय प्रदेशात (एसएआर) मृत्यू झालेल्यांपैकी 26 प्रकरणांची पुष्टी झाली आहे, तर मकाऊ एसएआरमध्ये 10 आणि तैवानमधील 17 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. मकाऊ आणि तैवानमधील प्रत्येक रूग्णाला बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

कोरोना संदर्भात महत्वाचे...
या रोगाचा आंतरराष्ट्रीय समूहाने अत्यंत गांभीर्याने विचार करणे जरुरीचे आहे. कारण, हा जरी एकाच कुटुंबातील विषाणू असला, तरीसुद्धा या विषाणूची जनुकीय रचना पूर्णतः विभिन्‍न आहे. कखत विषाणूसारखा हा विषाणूसुद्धा आपली संरचना बदलतो. त्यामुळे त्यावरची लस तयार करणे शक्य होत नाही. याउलट बाकीच्या विषाणूंवरची लस तयार करता आली.
1) या विषाणूचे उगमस्थान कोणते?
कखत एड्स हा विषाणू अशि मार्फत आला. सार्स व इबोला विषाणू वटवाघळांमार्फत आला. स्वाईन फ्लू हा विषाणू डुकरांमार्फत आला. बर्ड फ्लू पक्षांमार्फत आला.
तसा पउेत हा विषाणू चीनमधल्या वुहान प्रांतातील सीफूड आणि अ‍ॅनिमल मार्केटमधील दलालांमार्फत आलेला असण्याची शक्यता आहे.
2)  हा आजार कसा पसरतो?
हा संसर्गजन्य आजार आहे. हे विषाणू एकाकडून दुसर्‍याकडे संक्रमित होऊनच आपले अस्तित्व टिकवतात. प्राण्याकडून मनुष्याकडे संक्रमित होणे हाही एक अस्तित्व टिकवण्याचा प्रकार आहे. प्रथम हा विषाणू भक्ष्याची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी करतो आणि आपली संरचना बदलतो. याप्रकारे हा आजार वेगाने प्रसारित होतो.
3)  या आजाराची लक्षणे कोणती?
सर्वसामान्य लक्षणे ही ताप, सर्दी खोकला, श्‍वसनाला त्रास होणे व न्यूमोनिया ही असतात. काही रुग्णांमध्ये श्‍वसनाच्या त्रासाव्यतिरिक्‍त उलटी, मळमळ व डायरिया ही लक्षणे असू शकतात.
4)  हा आजार कखत एड्सपेक्षा गंभीर का आहे?
जरी हे विषाणू कखत सारखी आपली संरचना बदलत असले व प्राण्यांकडून मनुष्याप्राणी व मनुष्यप्राण्याकडून मनुष्याकडे जात असले. तरी या आजारात खोकल्यातील किंवा शिंकेतील थेंबामुळे पसरला जातो.तर कखत साठी शारीरिक संबंध किंवा रक्‍तातील संक्रमण जरुरीचे असते. त्यामुळे हा 'कोरोना' संसर्गजन्य रोग 15 दिवसांत पन्‍नास हजारहून जास्त लोकांना लागण करून गेला. तर 500 हून जास्त रुग्ण दगावले.
5)  या आजारासाठी कुणाची व कोणती तपासणी करावी? थकज ने काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत. चीनला भेट दिलेल्या व परत आलेल्या सर्व लोकांची तपासणी करणे जरुरीचे आहे. या सर्व लोकांना सर्वसामान्य लोकांपासून दूर ठेवणे.
या रुग्णांच्या तीन कॅटॅगरी आहेत.
1) संशयित रुग्ण : ज्यांना रोगाची लक्षणे आहेत आणि ज्यांनी चीन-वुहान येथे भेट दिलेली आहे. या लागण झालेल्या किंवा शक्यता असलेल्या पउेत रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कातले जवळचे रुग्ण.
2) शक्यता असलेले रुग्ण : संशयित असलेले 2019 पउेत झउठ पॉझिटिव्ह.
3) लागण झालेले रुग्ण : 2019 पउेत सिरॉलॉजी पॉझिटिव्ह रुग्ण; मग त्यांना लक्षणे असोत किंवा नसोत. घशातला आणि नाकातला स्वॅब हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथे पाठवून ही तपासणी केली जाते.
8) या आजारावरचे उपचार या आजारावरची लस उपलब्ध नसल्याने निश्‍चित उपचार होत नाहीत; पण प्रमाणित खबरदारी घेणे जरुरीचे असते. त्यासाठी मेडिकल मास्क, हात, नाक व तोंड यांच्या कूसळपश ची काळजी घ्यावी. खोकताना, शिंकताना स्वच्छ रुमाल घेणे आवश्यक आहे.
9) उपचार करणार्‍यांनी घ्यायची जबाबदारी रुग्णाला जखम होता कामा नये. डिस्पोजेबल वेस्ट योग्य ठिकाणी डिस्पोज झाले पाहिजे. स्टरलायजेशन योग्य असावे. सतत मास्क आणि स्पेशल गॉगल वापरणे. गाऊन आणि ग्लोव्हज वापरणे. मास्क आणि गॉगल यामध्ये कमीत कमी मोकळा भाग असावा. मास्क ओला झाल्यावर लगेच बदलणे.
10) रुग्णांना ठेवायचे कुठे? त्यासंबंधी काळजी काय घ्यावी? स्पेशली व्हेंटिलेडेट सिंगल रूम. संशयित रुग्णांमध्ये कमीत कमी 1 मीटरचे अंतर असावे. फक्‍त याच प्रकारच्या रुग्णांसाठी स्पेशल स्टाफ असावा. व्हिजिटर्स असू नयेत. रुग्णांनी इतरत्र न वावरणे. पेशंट 24 तास मास्कमध्ये. डॉक्टरांची उपकरणे जसे स्टेथॅस्कोप, थर्मामीटर, ब्लडप्रेशर मशिन प्रत्येक वापरानंतर अल्कोहोलने निर्जंतुक करणे.
11) या रोगामुळे होणारे आर्थिक परिणाम चीन ही महासत्ता असल्याने त्यांचे आर्थिक लागेबांधे 196 देशांपैकी जवळजवळ 2/3 देशांमध्ये आहेत. सार्स या रोगामुळे 2003 ला जागतिक अर्थव्यवस्थेला 40 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले होते, तर 'कोरोना' व्हायरसमुळे जवळजवळ 500 बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. जे. पी. मॉर्गनने वर्तवलेल्या आकड्यानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये 6.3 टक्क्यांपासून 4.9 टक्के इतकी घट झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास अजूनही घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊन काही देशांची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. उदा., पाकिस्तान.
12) हे जैविक युद्ध असण्याची शक्यता आहे का?
या रोगाचा उगम न मिळाल्यामुळे बर्‍याच मतप्रवाहांना वाव मिळाला आहे. त्यातील एक मतप्रवाह हा जैविक युद्ध हा आहे. एकंदर चीनचे होणारे नुकसान बघून त्यांनी हा व्हायरस सोडला असण्याची शक्यता नाही

(वरील माहिती,  लेख, बातमी विविध ऑनलाईन स्त्रोतांद्वारे माहिती मिळवून प्रसिद्ध केलेली आहे. 'पंढरपूर लाईव्ह' वर ताज्या बातम्या,  लेख, माहिती प्रसारित करताना ती सत्य असल्याची खात्री करण्याचा आमचा 100% प्रयत्न असतो. नकळत काही चुकीचे किंवा तथ्यहीन आढळून आले तर आम्हाला संबंधित वृत्त, लेख, माहितीसंबंधीत व्यक्ती, संस्था अथवा अभ्यासु वाचकांनी तात्काळ कळवावे ही नम्र विनंती. - संपादक)