न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 2 February 2020

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय


Pandharpur Live Web -  भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ५-०ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत १६३ धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावा करता आल्या. भारतीय संघाने मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवून दिला नाही. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही.

पाचव्या सामन्यात भारताने दिलेले १६४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची आघाडीची फळी अवघ्या १७ धावात माघारी परतली. पण त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेइफर्ट यांनी शानदार खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे रॉस आणि टिम यांनी दहाव्या षटकात ३४ धावा काढल्या. ही जोडी न्यूझीलंडला विजय मिळवून देईल असे वाटत असताना नवदीप सैनीने टिम सेइफर्टला बाद करत भारताला ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १३२ अशी केली. तर सैनीने न्यूझीलंडचा अखेरचा भरवश्याचा फलंदाज रॉस टेलरची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारता आली.No comments:

Post a Comment

Pages