संतापजनक- दीड वर्षाच्या नातवाला विहिरीत फेकून केली हत्या... क्रूर आज्जीस अटक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 21 February 2020

संतापजनक- दीड वर्षाच्या नातवाला विहिरीत फेकून केली हत्या... क्रूर आज्जीस अटक


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
दीड वर्षाच्या निष्पाप नातवाला पहाटे घराशेजारील विहीरीत टाकून देत खून करणाऱ्या क्रुर आजीला पाेलिसांनी अटक केली आहे. 4 जानेवारी राेजी ही घटना 4.30 च्या सुमारास घडली. आराेपी महिला दीड महिन्यांपासून फरार हाेती. पाेलिसांनी सापळा रचत आराेपी महिलेला आज सकाळी इंदापूर येथे अटक केली.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सुलोचना सदाशिव तनपुरे (रा. तनपुरवाडी व्याहाळी ता. इंदापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी मुलाचे वडील रवींद्र महादेव जराड यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली हाेती. रवींद्र जराड हे त्यांची पत्नी गौरी व दीड वर्षाचा मुलगा, वेदांत यांच्यासह इंदापूर तालुक्यातील तनपुरवाडी येथे आपल्या सासरवाडीत ३ जानेवारी २०२० रोजी काही कामानिमित्त आले होते, रात्री बारामतीला घरी जायला उशीर झाल्याने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलगा व पत्नीसह सासरवाडीत मुक्कामी राहिले.


ते झोपेत असताना पहाटे ४.३० वाजता फिर्यादीची सासू सुलोचना तनपुरे यांनी त्या लहान बाळाला घरा शेजारच्या विहिरीत टाकून दिले. सकाळी ६ वाजता रवींद्र जराड हे झोपेतून उठले असता, त्यांनी त्यांचा मुलगा रवींद्र याचा शोध घेतला तेव्हा तो कोठेही दिसला नाही. त्यांची सासु सुलोचना तनपुरे यांना विचारले असता, त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता, शेजारील विहारीत पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

आरोपी तनपुरे ह्या दीड महिन्यापासून फरार झाल्या होत्या, मात्र गुरुवारी त्या इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथील बस स्थानकावर येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून, महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने त्या महिलेला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान महिलेने नातवाचा खून का केला, याचे कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखा पथक इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना या खून प्रकरणातील आरोपी सुलोचना ही इंदापूर बस स्थानकात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या पथकाने महिला पोलिस अंमलदार यांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी तिला इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलिस हवालदार अनिल काळे व रविराज कोकरे, पोलिस नाईक प्रवीण मोरे,महिला पोलिस हवालदार पी. जी. कांबळे यांनी भाग घेतला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे करत आहेत.

add