अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 28 February 2020

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा

Pandharpur Live Online- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना दिंडोरी येथे 2017 मध्ये घडली होती. गोरक्षनाथ ऊर्फ गोरख मधुकर शेखरे (वय 25, रा. टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) असे आरोपीचे नाव आहे.

असा घडला प्रकार...
गोरख शेखरे मुंबईतील भायखळा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून नियुक्तीला होता. 2017 मध्ये तो सुटीवर दिंडोरीला आला होता. अल्पवयीन पीडित घरासमोरील ओट्यावर भांडे घासत होती. त्या वेळी आरोपी शेखरे याने तिला बाजूला येण्याचा इशारा केला.

त्याकडे पीडितेने दुर्लक्ष केले. नंतर आरोपी शेखरे याने तिचे तोंड दाबून बळजबरीने घराजवळच्या बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत पॉक्‍सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
दहा वर्षे सक्तमजुरी आणि 11 हजारांचा दंड
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा नायर यांच्यासमोर झाली. शेखरेविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायाधीश श्रीमती सुधा नायर यांनी त्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि 11 हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला एका वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. सरकारी पक्षातर्फे श्रीमती ऍड. रेवती कोतवाल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद आढाव, महिला पोलिस शिपाई ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.

add