पंढरपूर तालुक्यातील पळशीतील तरुणाचा खुन..5 जणांविरुध्द गुन्हा दाखल तीघांना अटक..सविस्तर बातमी! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 11 February 2020

पंढरपूर तालुक्यातील पळशीतील तरुणाचा खुन..5 जणांविरुध्द गुन्हा दाखल तीघांना अटक..सविस्तर बातमी!


Pandharpur Live - 
पंढरपूर : घरात असलेल्या देवकार्यातील मटणाच्या जेवणास न आल्याचा राग मनात धरून पळशी (ता. पंढरपूर) येथे एका  युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे, श्रीधर माणिक वाघमारे, सचिन सदाशिव वाघमारे (सर्व रा. पळशी, ता. पंढरपूर) या पाच जणांविरूध्द ( IPC 302,323,504,506,143,147,149) गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ राजाराम मोरे असे मारहाणीत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी दिगंबर उत्तम वाघमारे, नरायण उत्तम वाघमारे व श्रीधर माणीक वाघमारे यांना पोलसांनी तपासकामी पहाटे 5 वाजता अटक केली आहे. 

याबाबत मयताचा चुलत भाऊ दत्तात्रय माणिक मोरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिगंबर उत्तम वाघमारे, नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे, श्रीधर माणिक वाघमारे, सचिन सदाशिव वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मयत सोमनाथला आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहून घरातील महिलांनी सोमनाथला सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी महिलांना देखील मारहाण केल्याची माहिती पोलीसांनी दिली.No comments:

Post a Comment

Pages