पंढरपूर- पहाटे वॉकींग करणे सुध्दा बनतेय धोक्याचे! महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांचा पोबारा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

पंढरपूर- पहाटे वॉकींग करणे सुध्दा बनतेय धोक्याचे! महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांचा पोबारापंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
पंढरपूर शहर व परिसरात पहाटे किंवा सकाळी घराबाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणं सुध्दा महागात पडण्याची शक्यता निर्माण झालीय. नुकतीच याची प्रचिती एका महिलेला आली आहे. 


 सकाळी रस्त्याने फिरायल्या निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व हातातील मोबाईल अज्ञात दोन चोरट्यांनी हिसका देऊन चोरून नेले. ही घटना गुरुवारी (ता. 6) पहाटे पाच वाजणेच्या सुमारास टाकळी (ता. पंढरपूर) येथील अण्णाभाऊ साठे प्रशालेजवळ घडली. 

याप्रकरणी अश्‍विनी बाळासाहेब काकडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अश्‍विनी काकडे व त्यांच्या जाऊ मनीषा या दोघी गुरुवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमारास शाहूनगर ते टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. तेव्हा मागून दोघे दुचाकीवर आले. समोर येवून  गाडी आडवी लावली व काही समजण्याच्या आताच दोघा अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र व हातातील Vivo कंपनीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण आवचर करत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages