पंढरीत महिलेचा विनयभंग... पंढरपूर तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 21 February 2020

पंढरीत महिलेचा विनयभंग... पंढरपूर तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल!


Pandharpur Live-
पंढरपूर शहरात आज दि. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेचा हात धरुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात  गु.र. न.235/2020 भा.द.वि.क.354,354(ऊ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12/00 ते14/00 वा.चे. दरम्यान सदर महिला  पुष्कर मेडिकल स्टेशन रोड पंढरपूर येथील कट्टयावर बसलेली असताना आरोपी- समाधान शिवाजी दांडगे राहणार- कोंढारकी तालुका- पंढरपूर याने वाईट वाईट इशारे करून व महिलेच्या पाठीमागून येऊन त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी (त्यावरील मोबाईल नंबर 9623133096) असे लिहिलली चिट्ठी फिर्यादीचा हात धरून सदर महिलेच्या  हातात देऊन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य / वर्तन केले .

अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुंडे हे करत आहेत.

add