पुण्यात बंद फ्लॅट फोडून घरफोडी करणारी टोळी गजाआड... 110 किलो चांदी, 21 तोळे सोन्यासह 1 कोटींचा ऐवज जप्त - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 21 February 2020

पुण्यात बंद फ्लॅट फोडून घरफोडी करणारी टोळी गजाआड... 110 किलो चांदी, 21 तोळे सोन्यासह 1 कोटींचा ऐवज जप्तपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पुण्यासह पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्याभर बंद फ्लॅट फोडून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सराईत टोळीतील दोघांना वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, चोरीचे सोने घेणाऱ्या सराफालाही पकडण्यात आले आहे. केवळ 21 गुन्ह्यात 1 कोटींहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.त्यांच्याकडून ११० किलो चांदी, २० तोळे सोन्याचे दागिने, ६ मोटारी, २ दुचाकी मिळून १ कोटींवर अधिक ऐवज जप्त करण्यात आला.

तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा.रामटेकडी, हडपसर) आणि जयसिंग उर्फ पिल्लूसिंग कालुसिंग जुनी (वय २६, रा. वैदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. तर सोने स्वीकारणारा बंडू वसंत वाघमारे (वय ३५, रा. हडपसर) याला अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि सनीसिंग पापासिंग दुधाणी अशी फरार झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बंद फ्लॅट फोडण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. काही केल्या या घटना थांबत नव्हत्या. गुन्हे शाखेच्या पथकांना अनेक वेळा सूचना देहूनही या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान स्थानिक पोलिसांना देखील या घटना रोखण्यासोबतच चोरट्यांना पकडण्यास सांगितले गेले होते.

दरम्यान पिंपरी - चिंचवड परिसरातील काही महिन्यांपूर्वी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. त्या चोरट्यांचा पत्ता लागला नव्हता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यावरून चिरट्यांचा मग काढला जात होता. दरम्यान हे फुटेज वानवडी पोलिसांनी तपासले. त्यात चोरट्यांचे हावभाव, चालणे, चोरीची पद्धत एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा माहिती घेत असताना चोरटे हडपसर परिसरातील रामटेकडीमध्ये असल्याचे पोलीस शिपाई नासिर देशमुख आणि नवनाथ खताळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिलकिंसग आणि जयसिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विकीसिंगसह सनीपिंग या साथीदारांच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणी २१ गुन्हे केल्याची कबुली दिली. टोळके चोरी केलेला ऐवज बंडू वाघमारेला देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक सलीम चाउस, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड, रमेश भोसले, राजू रासगे, योगेश गायकवाड, संभाजी दिवेकर, नासिर देशमुख, नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, अनुप सांगळे, महेश कांबळे, सागर नवले, विशाल परकाळे, नीतेश पुंडे, सुदर्शन म्हांगरे, अजिंक्य नानगुडे यांच्या पथकाने केली.

add