लुटारुंनी केला सराफावर गोळीबार; एक जखमी एक ठार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 6 February 2020

लुटारुंनी केला सराफावर गोळीबार; एक जखमी एक ठार


Pandharpur Live Online-
संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरात सराफावर गोळीबार करत लुटारुंनी लाखो रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटल्याची घटना बुधवारी (5 फेब्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामध्ये सराफास सोडविण्यासाठी गेलेल्या अविनाश सुभाष शर्मा (वय 36) या दुचाकी स्वरावर लुटारूंनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तर, सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लुटारुंनी सराफाकडील मुद्देमाल घेऊन नाशिकच्या दिशेने पोबारा केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दुकान बंद करुन घराकडे वेगणार कार एम एच 12 ई एम - 0107 मधून चालले होते. आदर्शनगर येथे असलेल्या घारच्या बाहेर ते पोहचताच अज्ञात तीन ते चार लुटारुंनी त्यांच्यामागून दुचाकीने येत कारमध्ये बसले. त्यातील तिघांनी गाडीच्या काचा फोडत सराफास दमदाटी करण्यास सुरु केली. गाडीच्या फोडलेल्या काचेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. चिंतामणी यांची पत्नी आरती त्यांना सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. सराफ व लुटारु यांच्यात चालेल्या झटापटीमुळे तेथून जाणारा अविनाश शर्मा व त्याचा मित्र दुचाकीवरुन सराफाच्या जवळ आला. हे किरकोळ वाद नाही. तर, हे लुटारु आहेत, ते सराफास लुटत आहेत हे लक्षात येताच त्यांनी हलचाली सुरु केल्या. दुचाकीवरील शर्मा आपला पाठीमागून पाटलाग करतील याभीतीने लुटारुंनी शर्मा यांच्या दिशेने गोळी झाडली ती त्याच्या मांडीला लागली व तो खाली कोसळला.

लुटारुंनी सराफाकडील सोन्याचांदीची पिशवी हिसकडून पळ काढला. तर, सराफ व शर्माच्या मित्राने देखील जीव मुठीत धरुन स्वत:चा बचाव केला. लुटारुंनी नाशिकच्या दिशेने आपले वाहन भरधाव वेगात नेले. शर्मा यांना उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Pages