सांगलीत 40 हजारांचा गांजा जप्त... युवकास अटक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

सांगलीत 40 हजारांचा गांजा जप्त... युवकास अटक


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सांगली शहरातील रामरहीम कॉलनीत गांजा विक्रीसाठी आलेल्या रोहित जगन्नाथ आवळे (वय 25, रा. अभिनंदन कॉलनी) या  युवकाला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपयांचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली शहर चे उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी संजयनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते.

त्यावेळी रामरहीम कॉलनीत एक युवक गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आवळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ 2 किलो गांजा सापडला. त्याला तातडीने अटक करण्यात आली.

उपअधीक्षक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश माने, अनिल भोसले, सुनील कोकाटे, लखन होवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Pages