धक्कादायक- सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

धक्कादायक- सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सोलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 10 जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. 

या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर 5 जण अद्यापही फरार आहेत. बलात्कार आणि पोस्को अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रियकरासोबत 9 जणांनी मिळून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील बहुतेकजण रिक्षाचालक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या अल्पवयीन मुलीचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

प्रियकरानं त्याच्या मित्रांच्या साथीनं बलात्कार केला. अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी प्रियकर घेऊन जात असे आणि तिच्यावर बलात्कार करायचा. कधी गाडीत ,कधी लॉजमध्ये, कधी शेतामध्ये अशा ठिकाणी घेऊन जात असे आणि तिच्यावर बलात्कार करायचा. एका दिवशी चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी रिक्षाचालक असल्याचे समजते.

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती टिपरे यांच्याकडे आहे. त्यांनी आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकल्या असून अद्याप फरार 5 आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आरोपींवर अॅट्रोसिटी, आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages