आर. आर. पाटील यांचे निर्मलस्थळ लवकरच विकसीत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 16 February 2020

आर. आर. पाटील यांचे निर्मलस्थळ लवकरच विकसीत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


Pandharpur Live- 
सांगलीदि. 16 कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर नेत्याचे समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसीत केली जातील. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी (ता.तासगाव) येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्री. पवार यांनी अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटीलग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसहकार  पणन मंत्री बाळासाहेब पाटीलआमदार सुमनताई पाटीलआमदार अनिल बाबरजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजी राऊतमाजी आमदार सदाशिव पाटीअंजनीच्या सरपंच स्वाती पाटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेआर. आर. पाटील हे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. सामान्य माणसाचे हित जोपासू त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची बाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळून त्या खात्यांची उंची वाढविली. आर. आर. आबा यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनासंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे कै. आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे पुरस्कार र. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी वितरीत करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तासगाव  कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या गावांना सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही त्या गावात पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमनताई पाटील यांनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील.

add