शिक्षण विभागाचा शाळा प्रवेश तारखांचा घोळ... 6 वर्षे वय पुर्तीच्या अटीमुळे हजारो मुलांच्या भवितव्याशी खेळ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 29 February 2020

शिक्षण विभागाचा शाळा प्रवेश तारखांचा घोळ... 6 वर्षे वय पुर्तीच्या अटीमुळे हजारो मुलांच्या भवितव्याशी खेळ

Pandharpur Live-

पंढरपूर :  पहिल्याच्या वर्गात मुलांना कितव्या वर्षी प्रवेश द्यावा याबाबत शासनाच्या शिक्षण विभागातच धोरणाची धरसोड सुरू असल्यामुळे शाळा प्रवेशाच्या तारखांचा घोळ घातला जात आहे. आणि अगदी काही दिवसांच्या जन्म तारखा उशिरा असलेल्या हजारो मुलांच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. विशेष म्हणजे सी.बी.एस.ई.च्या मुलांना साडे पाच वर्षांच्या वयाची मुदत ग्राह्य धरून प्रवेश दिला जात असताना राच्या शिक्षण विभागाच्या मात्र 6 वर्षे पुर्णतेच्या अटीमुळे आणि त्यानंतरच्या तारखान्या घोळामूळे हजारो मुलाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

इयत्ता पहिल्या वर्गात मुलांना प्रवेश देताना त्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे असे निश्‍चीत ठरवून राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.  मात्र ही सहा वर्षे पूर्ण होण्याच्या प्रवेशपात्र तारखा गेल्या काही वर्षात सातत्याने बदलल्या आहेत. या बदलांच्या घोळांमध्ये पालक आणि शिक्षण संस्थाचालकही गोंधळलेले आहेत.

किमान 5 वर्षे 11 महिने ते  कमाल 7 वर्षे 2 महिने वय पुर्ण असलेल्या मुलांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जावा अशा शासनादेश आहे. मात्र ही वयोमर्यादा अगोदर 31 जुलै होती. ती 2018-19 या शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबर करण्यात आली. 2019-20 या शैक्षणिक वर्षात 15 ऑक्टोबर ही मुदत ग्राह्य धरण्यात आली. तर 2020-21 या शैक्षणिक वर्षात 31 डिसेंबर ही मुदत वाढवण्याचा विचार सुरू आहे. त्याचवेळी सी.बी.एस.ई. ला पहिलीच्या प्रवेशासाठी साडे पाच वर्षे वयाची सवलत आहे. त्यामुळे ज्या मुलांचे वय 15 ऑक्टोबर रोजी साडे पाच वर्षे आहे त्या मुलांना सी.बी.एस.ईच्या पहिलीच्या  वर्गात प्रवेश मिळतो आहे.
 मात्र राज्याच्या शैक्षणिक धोरणानुसार 6 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच  पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो. यामुळे ज्या मुलांचा 15 ऑक्टोबरनंतर  जन्म झालेला आहे त्या मुलांचे काही दिवसांकरिता शैक्षणिक नुकसान होत आहे. सी.बी.एस.ईच्या धरतीवर राज्यातही साडे पाच वर्षे वय पहिल्याच्या वर्षाकरिता ग्राह्य धरण्यात यावे अशी पालकांची मागणी आहे. मुलांच्या शारिरिक आणि बौद्धिक क्षमतेचा विचार करूनही पहिल्या वर्गात साडे पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना प्रवेश देणे योग्य राहिल असे पालकांतून बोलले जात आहे.
सी.बी.एस.ई.ला साडे पाच वर्षेराज्यात हल्ली सी.बी.एस.ई शाळांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम राज्य सरकारच्या शाळांवर आणि पटसंख्येवर होऊ लागला आहे. सी.बी.एस.ई.च्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेशाकरिता साडे पाच वर्षे वय ग्राह्य धरले जात असल्यामुळे त्या शाळेत प्रवेश घेणार्‍या मुलांचे वय वाया जात नाही. उलट राज्य शिक्षण विभागातील शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

add