१६ फेब्रुवारी रोजी क. भा. पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 February 2020

१६ फेब्रुवारी रोजी क. भा. पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन

PANDHARPUR LIVE -

पंढरपूर – ‘सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद व रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था व धार्मिक पर्यटनाचे अर्थशास्त्र’ या विषयावर १५ व्या वार्षिक अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले असून प्रा. आर. आर. थोरात यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. 

या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. संग्राम चव्हाण यांची निवड करण्यात आली असून ते परिषदेत बीजभाषण करणार आहेत. सो. अ. परिषदेचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव हुंडेकर, सचिव डॉ. राजाराम पाटील, अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन डॉ. बद्रीनाथ दामजी, व्यावसायीक अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे शिक्षक, संशोधक, मार्गदर्शक व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. किशोर शिंदे यांनी दिली आहे. 

add