पंढरपूर सिंहगडच्या ०८ विद्यार्थ्यांना मिळाली रेल्वेमध्ये नोकरी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 February 2020

पंढरपूर सिंहगडच्या ०८ विद्यार्थ्यांना मिळाली रेल्वेमध्ये नोकरी

Pandharpur Live -
     पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के.  एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आर. आर. बी मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट लोको पायलट पदाच्या परिक्षेत यश संपादन करून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    मुंबई येथील आर. आर. बी. यांच्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट लोको पायलट पदाची परिक्षा ही एकुण तीन टप्प्यात घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी २६००० जागेसाठी देशभरातुन २० लाख अर्ज दाखल झाले होते. या मधून कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार योगेश टरलेअक्षयकुमार सावंतमनोज मस्केआशिष थोरातअक्षय लवटेअमित पाटील आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील प्रवीण इंगवलेगोविंद खरातया ८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २०२० मध्ये त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत.
     दर्जेदार शिक्षणा बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाठी निसर्ग-रम्य असे वातावरण असुन विद्यार्थ्यांना अभ्यासाठी स्वतंञ हॉल उपलब्ध आहेत. याचबरोबर सांस्कृतिकसामाजिक उपक्रम महाविद्यालयात प्रत्येक वर्षी  राबवले जात असल्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थीना आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी वाव मिळत आहे. टीचर- गार्डियन पद्धती नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रकल्पधारीत शिक्षण दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळतो. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची दर्जेदार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच सरकारी नोकरी मध्ये निवड होत आहे. महाविद्यालयात स्पर्धा परिक्षेविषयी तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेतल्याने आम्ही या परिक्षेत यश प्राप्त करू शकलो असल्याचे यावेळी योगेश टरले यांनी सांगितले.
     रेल्वे मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश  करांडेडॉ. चेतन पिसेअकॅडमीक डीन डॉ. रविंद्र व्यवहारे आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तम अभियंतेसरकारी नोकरी व यशस्वी उद्योजक घडविण्याचे काम महाविद्यालयातील शिक्षक करीत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी शिक्षक वर्ग मेहनत घेत आहेत. स्पर्धा परीक्षेची माहिती वेळोवेळी महाविद्यालयात आम्हालाविद्यार्थ्यांना दिल्यामुळे आम्ही आज यश प्राप्त करू शकलो. - इंजि. योगेश टरलेअसिस्टंट लोको पायलट
 नांदेड

add