स्वेरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 11 February 2020

स्वेरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !


 स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरींगला राष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे पुणे येथील तंत्रशिक्षण संचालनालयाचे निवृत्त सहसंचालक डॉ. विजय कुलकर्णी यांच्या हस्ते डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत वालचंद अभियांत्रिकी, सांगलीचे निवृत्त प्राचार्य डॉ. ए.आर. यार्दी, एस.एच, कुलकर्णी, स्वेरीचे  संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त एच. एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, एन.बी.ए. समन्वयक प्रा. शरद कावळे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आदी .
Pandharpur Live-
 स्वेरीज् डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या पाच अभ्यासक्रमांना मिळाले 
''आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन''
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), पंढरपुरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगकॉम्प्युटर इंजिनिअरिंगइलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्यूनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग या पाचही प्रस्ताव दाखल केलेल्या पदविका अभ्यासक्रमांना सन २०१९ ते सन २०२२ पर्यंत देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन (एन.बी.ए.) हे मानांकन मिळाले असल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.  

       आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे पुणे येथील तंत्रशिक्षण संचालनालयाचे निवृत्त सहसंचालक डॉ. विजय कुलकर्णी यांच्या हस्ते  डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी या यशाचे श्रेय सर्व आजी-माजी विद्यार्थीपालकशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वेरी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स यांना दिले. पुढे डॉ.मिसाळ यांनी या मानांकनापासून मिळणार्‍या फायद्याबद्धलची माहिती दिली. एन.बी.ए.ही तंत्रशिक्षण संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून १९८९ मध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रमाणित करारांची सदस्य आहे. म्हणून हे मानांकन मिळालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे या सदस्य देशातील मानांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या तोडीचे संबोधले जातील. या करारामध्ये सामील असणारे देश ऑस्ट्रेलिया,  कॅनडा,  तैवान हाँगकाँग,  भारत, आयर्लंड,  जपान,  कोरिया,  मलेशिया,  न्यूझीलंड,  रशिया,  सिंगापूरदक्षिण आफ्रिकाश्रीलंकातुर्की युनायटेड  किंगडम आणि युनायटेड स्टेटस् हे आहेत. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांना एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानेमहाविद्यालयास विविध संशोधन निधी मिळण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरतंत्रशिक्षणाचे सर्वोच्च मानांकन एन.बी.ए मिळविणे सोपे नाही. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पर्यंत अशी मानांकने नसणार्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती तसेच इतर सवलती मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. हे मानांकन मिळण्याकरिता स्वेरी पदविका महाविद्यालयाने प्रमाणित पद्धतीचे सर्व कागदपत्रे सादर केल्यावर व त्यातील प्राथमिक निकषांवर महाविद्यालयाची गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतर एन.बी.ए.कडून ६ तज्ञांच्या समितीने महाविद्यालयात दि.४ ते ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यान भेट देवून सादर केलेल्या माहितीची शहानिशा व वस्तुस्थिती पाहून आपला अहवाल एन.बी.ए.कडे पाठविला. 

समितीने या महाविद्यालयाच्या विविध निकषांवर आधारित तपासणी केली असता मुख्यत्वे महाविद्यालयाची शैक्षणिक उद्दीष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची अंमलबजावणीविद्यार्थ्यांची गुणवत्ताशिक्षकांची गुणवत्ताशैक्षणिक व पायाभूत सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आतापर्यंत महाविद्यालयाने केलेली प्रगती याची दखल घेतली. एन.बी.ए. मानांकन हे सादर केलेल्या पाचही पदविका अभ्यासक्रमांना मिळाल्याने सर्व विभागप्रमुखांचेशिक्षकांचेशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे सरसर्व विश्वस्तआजी माजी विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले. कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर, कल्चर, कॅम्पस प्लेसमेंटअल्पावधीत निर्माण झालेले संशोधनाचे वातावरण आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळात मूल्यांकनात उत्कृष्टस्थानी असलेले, उत्तम शैक्षणिक निकाल आणि याच्या पंक्तीला आता एन.बी.ए. मानांकन आल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गात देखील समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या मानांकनाचा फायदा विद्यार्थ्यांना डिप्लोमाची पदवी प्राप्तीनंतर करिअर करताना होणार आहे. यावेळी  वालचंद अभियांत्रिकी,सांगलीचे निवृत्त प्राचार्य डॉ. ए.आर. यार्दी, एस.एच, कुलकर्णी, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त एच. एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, एन.बी.ए. समन्वयक प्रा. शरद कावळे, विभागप्रमुख प्रा. अवधूत भिसे, प्रा. एस.व्ही. कुलकर्णी, प्रा. अमेय भातलवंडे, प्रा. संदीप पवार , प्रा. रेणुका वाडेकर, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages