स्वेरीचा सांगलीच्या ज्ञानदिप इन्फोटेक प्रा.लि.व ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या बरोबर सामंजस्य करार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 February 2020

स्वेरीचा सांगलीच्या ज्ञानदिप इन्फोटेक प्रा.लि.व ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या बरोबर सामंजस्य करार


सामंजस्य कराराची प्रत स्विकारताना ज्ञानदिप इन्फोटेक प्रा.लि.व ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. एन. व्ही. रानडे, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे व स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, डॉ. संदीप वांगीकर व डॉ. विद्याराणी क्षीरसागर.
Pandharpur Live-
स्वेरीचा सांगलीच्या ज्ञानदिप इन्फोटेक प्रा.लि.व ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या बरोबर सामंजस्य करार
पंढरपूर- गोपाळपूर(ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा ज्ञानदिप इन्फोटेक प्रा.लिमिटेड, सांगली व ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, सांगली यांच्याबरोबर सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

            या करारामुळे स्वेरीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट या बाबतीत मार्गदर्शन आणि ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ व अर्धवेळ इंटर्नशिप आणि ट्रेनिंगची सुविधा ज्ञानदीप तर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ज्ञानदीप बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे कन्सल्टन्सी जनरेशन आणि एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटी सारख्या बाबींना स्वेरीमध्ये अधिक चालना मिळणार आहे. तसेच या करारामुळे सॉफ्टवेअरमध्ये संशोधन व विकासाला आणखी गती येणार आहे. हा सामंजस्य करार ज्ञानदीपचे चेअरमन डॉ. एन. व्ही. रानडे, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे व संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्विकारला. या करारापूर्वी स्वेरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३० कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. 

अशा करारामुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. तत्कालीन संशोधन अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे संशोधन विभाग सुरु करण्यात आला. भारत सरकारच्या भाभा अनुसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी जवळपास ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. या नवीन करारामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यावेळी एस.व्ही. रामचंद्रे, बी.डी.केळकर, जे.एम. गाडगीळ, प्रकाश कपिलेश्वर, सुहास देशपांडे, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदेविश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त एच. एम. बागल, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार,  एम.ओ.यु चे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर, डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.

add