स्वेरीत एमबीए विभागात ‘सीबॅट-२०२०’ सराव परीक्षा संपन्न


Pandharpur Live-
पंढरपूर–‘स्वेरीमधून मिळणारे शिक्षण हे पुण्या-मुंबईतील शिक्षणापेक्षाही अधिक दर्जेदार असल्याचे दिसून येते. म्हणूनच सुरवातीला केवळ ग्रामीण भागातीलच विद्यार्थ्यासाठी असणाऱ्या या स्वेरी महाविद्यालयात आता केवळ राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. बी. ए., बी.कॉम., बीएस्सी,बी.बी.ए.बीसीए , बीसीएस अशा पदवीनंतर एमबीएचे शिक्षण भविष्यकाळात फायदेशीर ठरते. कारण एमबीए नंतर जागतिक बाजारपेठेत मोठमोठ्या कंपन्यामध्ये मार्केटिंग, एचआर, फायनान्स, प्रोडक्शन, आय टी सिस्टिम्स, आंतरराष्ट्रीय बिझनेस, कृषी व्यवस्थापन या क्षेत्रात रोजगाराच्या मोठमोठ्या संधी उपलब्ध होतात.’ असे प्रतिपादन स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे  संचालक डॉ. आर. आर. येळीकर यांनी केले.

     एम.बी.ए., आय.बी.पी.एस., एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. अशा परीक्षांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मुख्य सीईटी परीक्षेचा सराव व्हावा याकरिता स्वेरीमध्ये सीबॅट (कॉमर्स अॅण्ड बिझनेस अवेरनेस टेस्ट) -२०२०  सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात आली. एम.बी.ए.बरोबरच इतर प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षेची पूर्णपणे तयारी व्हावी या हेतूने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम पवार यांच्या सहकार्याने स्वेरीमध्ये सराव परीक्षेचे आयोजन केले होते. या सराव परीक्षेच्या विजेत्यांना पुरस्कार देताना डॉ. येळीकर मार्गदर्शन करत होते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात प्रारंभी प्रा.यशपाल खेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात अव्वल असलेल्या स्वेरीबद्धल माहिती दिली. स्वेरीच्या स्थापनेपासून ते संशोधन निधी, मिळालेलं मानांकन, वसतिगृह सुविधा, रात्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग होतकरू विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कमवा व शिका योजना आदी महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे डॉ. येळीकर यांनी पुढे एमबीए नंतर होणाऱ्या रोजगार निर्मिती बद्धल माहिती दिली. एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी स्वेरीच्या एमबीए विभागाच्या यशस्वी वाटचालीचा लेखा जोखा सादर करून प्रवेशापासून ते वार्षिक निकाल व शिक्षणानंतरच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. या सराव परीक्षेला सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी या सीईटी परीक्षेत सहभाग नोंदविला. या सराव परीक्षेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या योगेश विरधे, द्वितीय क्रमांक दीपाली सुखदेव क्षिरसागर तर तृतीय क्रमांक पार्थ प्रशांत आराध्ये यांनी मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे रु.१५००/-, रु १०००/- व रु. ५००/ रु. अशी रोख पारितोषक व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. सदर कार्यक्रमास एम.बी.ए.विभागाचे प्रा.एम. एम. भोरे, प्रा. एस.ए. जगताप, प्रा. एस. बी. रोंगे, प्रा.पी. एस. मोरे, प्रा. ए. एन. गायकवाड आदी उपस्थित होते. सीबॅट सराव परीक्षेचे समन्वयक प्रा. आर.एन. मिसाळ यांनी सुत्रसंचालन केले तर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी एमबीएच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.