मोठी बातमी- राज्यातील ७००० शिक्षकांच्या नोकर्‍या धोक्यात! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 11 February 2020

मोठी बातमी- राज्यातील ७००० शिक्षकांच्या नोकर्‍या धोक्यात!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत सुमारे ७००० शिक्षकांच्या नोकर्‍या धोक्यात आहेत. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केला आहे. हा आदेश त्या शिक्षकांसाठी जारी केला आहे, जे शिक्षक पात्रता परीक्षा (TET ) पास झालेले नाहीत. राज्यात अशी सुमारे ७००० किंवा अधिक शिक्षक आहेत.

मुंबई हायकोर्टाने एका निकालात इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आणि राज्य सरकारने या निर्णयासोबत चालावे असे म्हटले आहे. शिक्षण संचालकांच्या नियमानुसार ३० मार्च २०१९ पर्यंत टीईटी परीक्षा पास नाही झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागतील.

यासंदर्भात राज्यातील विविध शिक्षकांनी याचिका दाखल केली होती, ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि राज्य सरकारने आपल्या निर्णयासह चालावे असे सांगितले.

उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशी धोरणे असणे अनिवार्य आहे. शिक्षकांच्या पदांवर पात्र उमेदवारांची निवड असावी जेणेकरून शिक्षणाची पातळी सुधारू शकेल. अनिवार्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते.

add