रयत सेवक हा कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त होतो - प्राचार्य डॉ. अशोक भोईटे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Tuesday, 4 February 2020

रयत सेवक हा कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त होतो - प्राचार्य डॉ. अशोक भोईटे


Pandharpur Live-

पंढरपूर – “. रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करताना तो सेवक हा कोणत्याही पदावर असला तरी त्याला सन्मानाची वागणूक मिळते. रयत परिवारावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे संस्कार असतात. त्यामुळेच सेवानिवृत्त होत असलेल्या सेवकांचा सन्मान केला जातो. म्हणून रयत सेवक हा कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त होत असतो.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले.


       

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात उपप्राचार्य बाळासाहेब तोडकरी व कार्यालयीन सेवक विनोद भालचंद्र कासार यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य बजरंग रोंगे, उपप्राचार्य अशोक चंदनशिवे, अधिष्ठात प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमात बाळासाहेब तोडकरी व विनोद कासार यांचा शाल, पुष्पहार, गुलाबपुष्प, विठ्ठल प्रतिमा व साडी देवून उभयतांचा सपत्निक प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिक्षक व शिक्षकेतर कल्याण समितीचे चेअरमन डॉ. सुखदेव शिंदे यांनी केले.

आपल्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाच्या सत्कारास उत्तर देताना उपप्राचार्य बाळासाहेब तोडकरी म्हणाले की, “रयत शिक्षण संस्थेच्या चार कॉलेजमध्ये मी एकूण ३५ वर्षे सेवा केली. प्रामाणिकपणा व चांगुलपणावर विश्वास ठेवून मी काम करत राहिलो. त्याचेच फळ म्हणून आज माझे कुटुंब अतिशय सुस्थितीत आहे. २३ वर्षाच्या कालावधीत माझ्याच महाविद्यालयात मला सेवा करण्याची संधी मिळाल्याने खूप कांही शिकता आले. रयत शिक्षण संस्थेने मला खूप चांगली वागणूक दिल्याने मी आज कृतार्थ आहे.” तसेच विनोद कासार यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असताना सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतार्थ भावना व्यक्त केली.

या सत्कार समारंभात डॉ. हनुमंत लोंढे, हनुमंत खपाले व सौ. मिनल तोडकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सौ. जयश्री तोडकरी, श्री. किसन मेनकर, सौ. पुष्पा मेनकर, विक्रमसिंह तोडकरी, डॉ. आशुतोष तोडकरी, सौ. विद्या विनोद कासार, अक्षय कासार, ऋतुराज कासार, महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रघुनाथ पवार यांनी केले. तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. राजेंद्र पाटील यांनी मानले.

Ad