क. भा. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ ९ फेब्रुवारीस संपन्न होणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 7 February 2020

क. भा. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ ९ फेब्रुवारीस संपन्न होणार


पंढरपूर – “रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचा चालू शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निबांळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील हे आहेत. 

या कार्यक्रमास शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सुभाषआबा  सोनवणे, चंद्रकांत गायकवाड, राजुबापू पाटील, सुनेत्राताई पवार, डॉ. राजेंद्र जाधव, बाळासाहेब पाटील (वरवडे), नानासाहेब लिगाडे, बाळासाहेब पाटील (रोपळे), माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख, डाळिंबरत्न दत्तात्रय भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.”
या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ पातळीवरील यशस्वी खेळाडू, युवा महोत्सवात विशेष प्रावीण्य मिळविलेले कलाकार विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेतील विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेले स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेतील राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात यशस्वी कामगिरी केलेले छात्र, विद्यापीठ पातळीवर सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी, वाङ्मय व वक्तृत्त्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, नेट-सेट उत्तीर्ण प्राध्यापक, एम.फील., पीएच. डी. पदवी प्राप्त प्राध्यापक, पुस्तक लेखक आणि विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

तरी या कार्यक्रमास रयत प्रेमी, हितचिंतक, पालक, माजी विद्यार्थी, पत्रकार आदींनी उपस्थित राहावे. असे आवाहन क्रीडासंचालक डॉ. नितीन सोहनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले आहे.

add