कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे 'पॉवर पॉइंट' प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न

उद्घाटन प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. स्नेहीत कुलकर्णी, प्रा.सौ.सविता दुधभाते व प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर व इतर शिक्षक वृंद.

पंढरपूर लाईव्ह- दिनांक २८/०१/२०२० रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपुर संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ही स्पर्धा संपन्न झाली. सध्याच्या जीवनामध्ये मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा घटक हा संगणक आहे, संगणकामुळे कामाची गती व प्रगती वाढले आहे याच प्रगतीला जोड देत आपले सादरीकरण जोरदारपणे करता येणे हाही एक कौशल्याचा भाग आहे. त्याच अनुषंगाने प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या आगळा-वेगळा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन उपक्रम यावेळी प्रशालेच्या ठिकाणी घेण्यात आला.

 या प्रसंगाचे औचित्य साधून उमा कॉलेजचे प्राचार्य श्री मिलींद परिचारक सर यांच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री स्नेहल कुलकर्णी व प्राध्यापक सौ सविता दुधभाते हे प्रमुख पाहुणे व परिवेक्षक म्हणुन या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा.कुलकर्णी व प्रा.दुधभाते आणि प्रशालेच्या प्राचार्य शैला कर्णेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्राध्यापक श्री कवठेकर यांनी संगणक व तंत्रज्ञान यांची असलेली आवश्यकता व सादरीकरणाचे असणारे महत्त्व त्यांनी याठिकाणी विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर त्यांनी सर्व प्रशालेंना आवाहन केले की कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेसारखे स्तुत्य उपक्रम व शालेय उपयोगी स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. या स्पर्धेस तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये द.ह. कवठेकर प्रशाला पंढरपूर, लोटस इंग्लिश स्कूल पंढरपूर, एमआयटी स्कूल वाखरी, कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, अरिहंत सीबीएससी स्कूल पंढरपूर, कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या शाळांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी सर्व शाळांनी आपले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वेगळ्या वेगळ्या विषयावर जोरदार व ठळकपणे सादर केले. या स्पर्धेमध्ये लोटस इंग्लिश स्कूल या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तसेच द्वितीय क्रमांकाची मानकरी द.ह.कवठेकर प्रशाला ठरली तसेच तृतीय क्रमांक एमआयटी स्कूल वाखरी व कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर यांच्या रस्सीखेचात दोन्ही शाळांना विभागून मिळाला.  
या स्पर्धेची तयारी प्रशालेचे संगणक शिक्षक श्री अमोल डुणे व पल्लवी दशरथ यांनी केली. या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक आ.प्रशांत परिचारक यांची सर्वांना खंबीर साथ लाभली.