कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “प्लॅस्टिक वेचा” मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 19 February 2020

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “प्लॅस्टिक वेचा” मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली


Pandharpur Live-
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे शुक्रवार, दि.१४.०२.२०२० रोजी १ मे
या महाराष्ट्र दिनापर्यंत “प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र” साकारणे करीता माननीय पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्य ठाकरे यांनी आदेशित केल्याप्रमाणे “प्लॅस्टिक वेचा” या विषयावर राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेने उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. याप्रसंगी प्रशालेमध्ये सकाळी ठीक ९.३० वाजता प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांनी मुलांना प्लॅस्टिक पासून होणारे दुष्परिणाम याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली, त्यांनी सांगितले की प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे आणि त्याचे गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आरोग्यावर झाले आहेत.

आज प्लॅस्टिकच्या भस्मासुराने पृथ्वीला गिळायला सुरुवात केली आहे. प्लॅस्टिकमुळे जल प्रदूषण व वायु प्रदूषण होत आहे, तरी आपण प्लॅस्टिक वापरू नये असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील तसेच आसपासच्या नगरात यामध्ये समता नगर,
वांगीकर नगर व मंगळवेढेकर नगर या ठिकाणचा प्लॅस्टिक कचरा एकत्र केला व तो नगरपालिकेकडे जमा करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने “प्लॅस्टिक वेचा” मोहिमेत कर्मयोगी विद्यानिकेनच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग मोठ्या उत्साहात नोंदविला.

या कार्यक्रमासाठी माननीय आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रेरणेने व प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर,
रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री राजेंद्र सावंत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

add