“कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान” - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 20 February 2020

“कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान”

Pandharpur LIve-
‘श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन” पंढरपूर येथे शनिवार, दिनांक ०८/०२/२०२० रोजी पंढरपूर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  दयानंद गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व त्यासमोरील आव्हाने व त्यांना कशा पद्धतीने सामोरे जावे याचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक दयानंद गावडे व प्रशालेच्या प्राचार्य सौ शैला कर्णेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व नंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना श्री गावडे साहेब म्हणाले की प्रत्येक व्यक्तीचे आगळं वेगळ अस्तित्व व एक सुंदर अस व्यक्तीमत्व असते, जे रुपांतुन दिसण्यापेक्षा त्याची वागणुक, कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी यातून ते दिसून येते आणि हे विद्यार्थी दशेतच कशाप्रकारे व्यक्तिमत्व विकास घडवला गेला पाहिजे यासाठी आई, वडील व शिक्षक किती महत्वाचे घटक आहेत ते सांगितले. तसेच स्वतःला कमी न समजता आपले गुणदोष ओळखून आयुष्याची योग्य दिशा निश्चित करणे महत्त्वाचे असते त्याच बरोबर ध्येय, आत्मविश्वास, सकारात्मकता व कठीण परिश्रम ही चतुःसूत्री त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या खास पोलीसी शैलीमध्ये सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थी मित्रांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले व सामाजिक बांधिलकी जोपासली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

 या उपक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्य शैला कडेकर मॅडम यांचे आभार मानले याप्रसंगी प्रशालेचे रजिस्टर श्री गणेश वाळके साहेब प्रशालेच्या प्राचार्य शैला कानेकर मॅडम प्रशालेचे शिक्षक श्री अमोल डुणे, श्री किरण गोरे, सौ संध्या जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री किरण गोरे यांनी गावडे यांचे आभार मानून केली.

add