लोटसच्या हर्षवर्धन जगदाळे याचे ऑलंपियाडमध्ये यश - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 9 February 2020

लोटसच्या हर्षवर्धन जगदाळे याचे ऑलंपियाडमध्ये यश


पंढरपूर– सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या परीक्षेमध्ये कासेगाव (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी हर्षवर्धन जगदाळे याने ४० पैकी ३७ गुण मिळवले. विभागीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १७ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

विभागीय स्तरावरील प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आले. गणित विषयाच्या शिक्षिका सीमा चव्हाण, प्राथमिक विभागप्रमुख सविता झांबरे, ऑलंपियाड विभागप्रमुख सचिन निकम, अमृता मोरे, सुनिता आसबे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव डॉ. बी.पी रोंगे,अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण व पालकांनी हर्षवर्धन जगदाळे याचे अभिनंदन केले.

add