पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक सभा संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 11 February 2020

पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक सभा संपन्नPandharpur Live-

पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक सभा नुकतीच संपन्न झाली.
पालक सभेसाठी सुमारे 400 पालक उपस्थित होते याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दयानंद गावडे यांचे मार्गदर्शन पर भाषण खास पालकांसाठी ठेवण्यात आले होते.

तसेच भागवताचार्य श्री ह.भ.प. वा.ना. महाराज उत्पात यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री मो.चिं. पाठक, श्री सु.र. पटवर्धन, श्री ना. बा. रत्नपारखी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुनिता मोहोळकर यांनी केले. कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेरणारे, कर्तव्याच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाचा मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, तसेच सर्वच क्षेत्रात बहुआयामीत्व सिद्ध करणारे भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे हा बहुमोलाचा धार्मिक पुरस्कार पुणे येथील देवदेवेश्वर संस्थान कोथरूड व पर्वती यांच्यावतीने दिनांक 29 जानेवारी 2020 रोजी प्राप्त झाला.

त्यानिमित्ताने आमच्या प्रशाले कडून घरचा घरचा प्रेमाचा सत्कार सोहळा प्रमुख पाहुणे श्री दयानंद गावडे तसेच संस्थेचे पदाधिकारी व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संस्कृती शिवाय प्रगती नाही भारतीय संस्कृतीचे प्रथम शिक्षण मुलांना द्यायला हवे ही फक्त शाळेची जबाबदारी नाही तर पालकांचीही जबाबदारी आहे असे प्रतिपादन माननीय श्री दयानंद गावडे यांनी केले. आज प्रॉमिस डे च्या दिवशी सुरक्षिततेची हमी व संरक्षणाचे प्रॉमिस त्यांनी केले. भागवताचार्य वा. ना. महाराज यांनी पालकांना संस्कृती संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

No comments:

Post a Comment

Pages