राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत स्वेरीच्या ऋतुजा जाधव प्रथम - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 17 February 2020

राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत स्वेरीच्या ऋतुजा जाधव प्रथम

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्नीक)च्या  ऋतुजा जाधवने उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे तासगाव महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम.पी. हंपली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Pandharpur Live-
                पंढरपूर- तासगाव (जि. सांगली) जी. आर. डब्ल्यू. पी. (गव्हर्मेंट रेसिडेन्शीयल वुमेन्स पॉलिटेक्निकयेथील महाविद्यालयामध्ये झालेल्या राज्यस्तरीय (इंटरझोनल) मुलींच्या १३५ सेमी उंच उडी स्पर्धेत गोपाळपूर(ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्नीक) मधील इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी विभागाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा किशोर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
                 तासगावमध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध विभागातून सोळा विद्यार्थीनी स्पर्धेसाठी आल्या होत्या त्यातून ऋतुजा जाधव हीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडा  विषयक उपक्रमावर भर दिला जातो.  त्यामुळेच स्वेरीचे विद्यार्थी शैक्षणिक कामगिरी बरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील आपले कौशल्य दाखवीत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या व क्रीडा शिक्षक प्रा.एच. डी. ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनी विशेष कामगिरी बजावत आहेत. यामुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे जाधव हिचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.


add