स्वेरीज् एम.बी.ए.च्या पायल टमटम व भक्ती देशपांडे पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठात अनुक्रमे द्वितीय व तृतीय - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

स्वेरीज् एम.बी.ए.च्या पायल टमटम व भक्ती देशपांडे पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठात अनुक्रमे द्वितीय व तृतीय

पंढरपूर-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमध्ये स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एम.बी.ए. विभागातील अंतिम वर्षाच्या पायल दत्तात्रय टमटम यांचा द्वितीय क्रमांक तर भक्ती बाळकृष्ण देशपांडे यांचा तृतीय क्रमांक आला आहे.


          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१८-१९  मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला या परीक्षेमध्ये स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एम. बी. ए. विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनी पायल दत्तात्रय टमटम यांनी द्वितीय क्रमांक तर भक्ती बाळकृष्ण देशपांडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्वेरीने निकालाच्या बाबतीत सोलापूर विद्यापीठात अव्वल राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थीनींना विभागप्रमुख प्रा. करण पाटील व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकरसंस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी पायल टमटम व भक्ती देशपांडे  यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Pages