स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती उत्साहात साजरा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 20 February 2020

स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती उत्साहात साजरा
Pandharpur Live-
महाराजांच्या मूर्ती-प्रतिमेचे पूजन करण्यासोबतच त्यांचे गुणही आत्मसात करावेत
                                                 -मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके
पंढरपूर- शिवरायांचा आपल्या मावळ्यांवर एवढा प्रचंड विश्वास होता की प्रत्येक मावळा आपल्यावर सोपविलेल्या  कामगिरीमध्ये तल्लीन रहायचा. त्यामुळे आजही माझा तरुणांवर प्रचंड विश्वास आहे. या तरुणांचा किल्ल्यांवरती पाय पडल्याशिवाय शिवरायांची थोरवी समजणार नाही. शिवाजीराजे हे अखंड कार्यातून परिपूर्ण राजे होते. शिवाजी महाराज हे अभियंता, आर्कीटेक्ट, अर्थकारणी, राजकारणी असे होते. शिवरायांची एवढी कीर्ती महान आहे की त्यांच्या कार्याची उंची ही आकाशापेक्षाही अधिक आहे. आग्र्यावरून केलेली सुटका, त्यांना सावलीप्रमाणे सोबत राहणारे हिरोजी फर्जंद, जयसिंग राठोड, येसाजी कंक, मदारी मेहतर यांची ही कामगिरी खूप महत्वाची होती. औरंगजेबाच्या सैन्यांनी शिवरायांच्या कीर्तीचा एवढा धसका घेतला होता की शिवरायांच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी त्यांना एक महीन्याचा कालावधी लागला. तसा पत्रांतून उल्लेख आहे. म्हणूनच महाराजांच्या मूर्ती-प्रतिमेचे पूजन करण्यासोबतच त्यांचे गुणही आत्मसात करावेत.’ असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या गडकोट संवर्धन समितीचे सदस्य व मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी केले.


       येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या मध्यवर्ती ओपन थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मैत्रेय प्रतिष्ठानचे डॉ. अडके उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांसमोर शिवचरित्र उलगडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या वाटचालीची माहिती देवून ‘राजा शिवछत्रपतींच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. यावेळी शिवानी बेणारे व आशुतोष डोळे या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांमधील नेतृत्व गुण अंगीकारणे गरजेचे आहे.असे सांगितले. विवेकवर्धिनीचे सहशिक्षक शिवाजीराव येडवे यांनी  छत्रपती शिवाजींच्या कार्यावर कविता सादर केली. अध्यक्ष स्थानावरूनबोलताना ना. चरेगावकर म्हणाले की, ‘महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम एवढ्यासाठी साजरे करतात की महापुरुषांच्या आयुष्यातील, कार्यातील गुण व पैलू आत्मसात करता यावेत,त्यांचे  अनुकरण करता यावे. शिवरायांच्या नियोजनाची व कार्याची जाणीव व्यासपीठावरून होत नाही यासाठी प्रत्येकाने वर्षातून एखाद्या तरी गडकिल्ल्याला भेट द्यावी.

 स्वेरीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘स्वेरी हे केवळ एक ज्ञानपीठ नसून एक संस्कारपीठ सुद्धा आहे. ज्यांना स्वतःच्या शिक्षणाची भ्रांत होती अशा एका व्यक्तीने एका ध्येयाने वेडे होऊन ‘माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले’ पाहिजे यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन हा कॅम्पस उभा केला.’ यावेळी संपूर्ण स्वेरी कॅम्पस विद्यार्थ्यांच्या जय भवानीजय शिवाजी ! जय जिजाऊ ! जय शिवराय!’ अशा विविध घोषणांनी दणाणत होतातर लेझीम,ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी आणलेल्या शिवमूर्तीच्या पालखीने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. इंजिनिअरिंगच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यमुर्ती व त्यासमोर विद्यार्थींनींनी काढलेली शिवरायांची आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. एकुणच संपुर्ण कॅम्पस शिवमय बनला होता. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या परीक्षा व विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

 एकूण चार लाख एकाहत्तर हजार रुपयांची रोख पारितोषके विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यामंदीर, सांगोल्याचे प्राचार्य आर.एम. घोंगडे, शिवाजी विद्यालय महूदचे सहशिक्षक व्ही. एम. येलपले, यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी, मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष विजय वाघ, कल्याण गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे भगवान अधटराव, पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी.रोंगेविश्वस्त प्रा. सुरज रोंगेसांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटीलबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवालडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेडिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळसर्व  अधिष्ठाताविभागप्रमुख, प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन योगिता मस्के, सिमरन मुजावर, निखील शिंदे व प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.  

add