स्वेरीमध्ये दि.८ फेब्रुवारी रोजी ‘पर्यावरण युवा जागृती’ या विद्यापीठस्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन


पंढरपूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरश्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर, सामाजिक वनीकरण विभागसोलापूरश्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर, आर्ट ऑफ लिव्हींगदेवराई फाउंडेशनतळेगावश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई प्रतिष्ठानपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये ‘पर्यावरण युवा जागृती’ या विद्यापीठस्तरीय पथनाट्य स्पर्धांचे दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

        विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘पर्यावरण, सामाजिक वनीकरण, प्रदूषण समस्या व निसर्ग संवर्धन’ या विषयावर आयोजिलेली ही स्पर्धा स्वेरीमध्ये शनिवार दि.८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम क्रमांक रु.१०,०००/- व स्मृतिचिन्ह ,द्वितीय क्रमांक रु.७०००/- व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक रु.५०००/- व स्मृतिचिन्ह असून उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. यशपाल खेडकर (मोबा.नं ९५४५५५३६९९) यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.