स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या सतरा विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. परिक्षेत यश ! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 9 February 2020

स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या सतरा विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. परिक्षेत यश !


पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित औषधनिर्माण शास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२० या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे अपूर्वा संजय जवंजाळ, स्वप्ना लहू सावंत, शितल विजय नरळे, काजल नागनाथ सपाटे आश्लेषा जगन्नाथ माळी, सोहेल इसाक इनामदार, पल्लवी अशोक नरळे, अनुराधा अनिरुद्ध पाटील, प्राजक्ता गोरख वाघमारे, मोनिका सहदेव मासाळ, आरती विनायक माने. सुरज परमेश्वर बनसोडे, पवन विजय सुरवसे तसेच बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे रोहन नेमीनाथ क्षीरसागर, शिवानी श्रीकांत सरवदे, योगेश आण्णा हडळ, हर्षदा गोरख जानकर असे एकूण १७ विद्यार्थी हे एम. फार्मसी शिक्षण घेण्यासाठी ए.आय.सी.टी.ई. अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी.पी.ए.टी. परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखालीबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली तसेच उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतल.


जानेवारी २०२० रोजी झालेल्या जी.पी.ए.टी. परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. २००६ साली स्थापन झालेल्या बी. फार्मसीमध्ये प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. सन २०१० साली संतोष गेजगे या विद्यार्थ्याने याच जी.पी. ए. टी. परीक्षेत भारतात ११७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाचा पाया खणला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी स्वेरीच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जीपॅटमध्ये भरघोस यश मिळत आहे आणि हीच परंपरा यंदा देखील कायम राखली असल्याचे दिसून येते. यशस्वी विद्यार्थी मात्र यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांबरोबरच पंढरपूर पॅटर्न’ व रात्र अभ्यासिकेला देखील देतात. मिळालेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे हे मात्र निश्चित. यशस्वी विद्यार्थ्यांना जीपॅटचे समन्वयक प्रा. विजय चाकोते, प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. ज्योती मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकरसंस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तप्राचार्य डॉ. अमित गंगवालसर्व प्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

add